ठाणे दि.१४ :- ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यूसंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, आरोग्य संचालनालय संचालक, अतिदक्षता विभागाचा तज्ञ, जिल्हा शल्यचिकित्सक या समितीचे सदस्य असणार आहेत. चौकशी अहवाल लवकरात लवकर देण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत.