Skip to content
डोंबिवली दि.११ :- टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली ब्राह्मण उद्योजक आणि नमस्ते शौर्य फाऊंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी राखी पाठविण्यात येणार आहे.
सीमेवरील सैनिकांसाठी पाठविण्यात येणा-या राख्या सेवा विवेक संस्थेच्या आदिवासी महिलांनी तयार केल्या आहेत. या राखीचे वैशिष्ठ्य म्हणजे ही राखी राखी वृक्षारोपण/ पर्यावरण संवर्धनपूरक आहे.
उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि सैनिकांना राखी पाठविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरील गूगल फॉर्म भरुन २०० रुपये किंवा त्या पटीत पैसे जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
केदार पाध्ये 9769121077/ कुणाल सुतावणे 9819504020