Skip to content
मुंबई दि.११ :- दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकात भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या नियोजित पुतळ्याच्या प्रतिकृतीस मान्यता देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गुरुवारी त्यासंबंधीचा शासन आदेश काढला.
गझियाबाद शिल्पशाळेतील २५ फुटी प्रतिकृतीच्या धर्तीवर हा भव्य पूतळा उभारण्यात येणार आहे. शिल्पकार राम सुतार यांनी शिल्पशाळेत डॉ. आंबेडकर यांच्या २५ फूट उंचीच्या पुतळय़ाची प्रतिकृती तयार केली. नियोजित पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी करून संमती देण्यात आली.