महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ‘इंडिया’ आघाडी बैठकीच्या तयारीचा आढावा – ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक
मुंबई दि.१० :- येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असून महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज वाकोला येथील ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष माजी मंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, शिवसेना खासदार संजय राऊत आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला