रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
मुंबई दि.०५ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या (रविवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते ठाणे अप – डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ८.३० ते दुपारी १. ३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल लोकल डाउन जलद मार्गावर तर कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
सुट्टीच्या दिवशी उपमुख्यमंत्री पवार मंत्रालयात नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही करण्याची सूचना
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला- वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावरील तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/ पनवेल/बेलापूरकडे डाउन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
कर्करोगावर मात केलेल्या लढवय्यांचा आनंद मेळावा!
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सुट्टीच्या दिवशी उपमुख्यमंत्री पवार मंत्रालयात नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही करण्याची सूचना
पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत मरिन लाइन्स आणि माहीम रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर लोकल थांबणार नाहीत.