कर्करोगावर मात केलेल्या लढवय्यांचा आनंद मेळावा!
प्रतिनिधी
मुंबई दि.०५ :- माजी नाट्य व्यवस्थापक आणि ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेला एक आगळा कार्यक्रम नुकताच दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आला होता. कर्करोगावर मात करुन आनंदाने आयुष्य जगणाऱ्या लढवय्यांच्या आनंद मेळाव्याचे.
पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
कर्करोगावर मात केलेले ४० जण आपल्या कुटुंबियांसह कार्यक्रमाला उपस्थित होते. कर्करोगावर मात करणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्करोगमुक्त पत्रकार नेहा पुरव यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.
सुट्टीच्या दिवशी उपमुख्यमंत्री पवार मंत्रालयात नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही करण्याची सूचना
राजश्री बोरकर, तृप्ती तोडणकर आणि पत्रकार नेहा पुरव यांनी यावेळी आजाराशी दोन हात करण्याचे अनुभव सांगितले आणि कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा कानमंत्र दिला. कर्करोगमुक्त प्रदीप पाटोळे यांनी गाणी म्हटली. केतकी भावे- जोशी, जयंत पिंगुळकर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम यावेळी सादर झाला.