गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेतर्फे मुंबई ते कुडाळदरम्यान १८ अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाडय़ा
मुंबई दि.२६ :- गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेतर्फे मुंबई ते कुडाळदरम्यान विशेष १८ अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेनेही ४० विशेष रेल्वे गाडय़ा सोडण्याची घोषणा केली आहे.
लोकमान्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी भात शेतीचा अनुभव घेतला
गाडी क्रमांक ०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ ही गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दर सोमवार, बुधवारी आणि शनिवारी धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२.४५ वाजता गाडी सुटेल आणि कुडाळ येथे सकाळी ११.३० वाजता पोहोचेल.
दहिसर ते भाईंदर उन्नत मार्गासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण
गाडी क्रमांक ०११८६ कुडाळ येथून दर मंगळवारी, गुरुवारी, रविवारी दुपारी १२.१० वाजता सुटेल आणि रात्री १२.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबा देण्यात आला आहे.
