दहिसर ते भाईंदर उन्नत मार्गासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण
मुंबई दि.२६ :- मुंबईतील दहिसर ते ठाणे जिल्ह्यातील भाईंदर हे अंतर आता येत्या काही वर्षांत अवघ्या दहा मिनिटात पार करता येणार आहे. दहिसर ते भाईंदर उन्नत जोडरस्ता (डीबीएलआर) प्रकल्पातील निविदा प्रक्रिया पार पडली. विहित प्रक्रियेनुसार या प्रकल्पाचे काम लार्सन एण्ड टुब्रो कंपनीला देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कृषी विभागाची कडक कारवाई – धनंजय मुंडे
मुंबई किनारी रस्त्याचा अंतिम टप्पा असलेला हा उन्नत मार्ग बृहन्मुंबई महापालिकेने चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रकल्पात एक पूल आणि दोन आंतरबदल मार्गिकांचा समावेश आहे.
गणेशोत्सव मंडळांसाठी ‘एक खिडकी’ सुविधा – १ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज
मुंबई आणि भाईंदर ही दोन शहरे जोडण्यासाठी उन्नत मार्गाची आखणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी .वेलरासू यांनी दिले होते. त्यानुसार आराखडा तयार करून दहिसर-भाईंदर उन्नत मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
