माजी नगरसेवक वामन सखाराम म्हात्रे यांचे निधन
डोंबिवली दि.२४ :- माजी नगरसेवक वामन सखाराम म्हात्रे यांचे रविवारी रात्री हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
वारकरी लाठीहल्ला प्रकरणी विरोधकांची विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
१९९५ पासून सलग तीन वेळा ते कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. स्थायी समिती सभापती म्हणूनही त्यांनी काम केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील एका निष्ठावान शिवसैनिक म्हणून वामन म्हात्रे यांची ओळख होती.
अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असलेल्या दीड हजारांहून अधिक रुग्णवाहिका राज्य शासन खरेदी करणार
कडोंमपातील गैरव्यवहारांची अनेक प्रकरणे त्यांनी बाहेर काढली होती. महापालिकेतील जलवाहिनी घोटाळा त्यांनी बाहेर काढला होता. सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
