आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समितीतर्फे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
मुंबई दि.२४ :- मुलुंड येथील आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समितीतर्फे आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंतीनिमित्त येत्या ६ ऑगस्ट रोजी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होता येईल.
माजी नगरसेवक वामन सखाराम म्हात्रे यांचे निधन
स्पर्धेसाठी आचार्य अत्रे आणि मराठी अस्मिता, जनतेचे कैवारी आचार्य अत्रे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्या आकांक्षा, पत्रकारिता कालची आजची, असे विषय असून यापैकी एका विषयावर बोलायचे आहे. प्रत्येक स्पर्धकाला सात मिनिटांच्या अवधीत विषय मांडायचा आहे. प्रथम पारितोषिक विजेत्या स्पर्धकाला आचार्य अत्रे फिरता करंडक प्रदान करण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्ज प्राचार्यांच्या शिफारशीने पाठवायचे आहेत.
वारकरी लाठीहल्ला प्रकरणी विरोधकांची विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
मुलुंड पूर्व येथील वझे महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी साडेनऊ वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला अनुक्रमे २ हजार, दीड हजार आणि एक हजार रुपयांचे पारितोषिक देणार आहे. अधिक माहितीसाठी 9967013567 किंवा 74209 40487 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
