अभिनेता विवेक ओबेरॉयची दीड कोटी रुपयांची फसवणूक
मुंबई दि.२१ :- चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करण्यासाठी एकत्रित सुरू केलेल्या आनंदीता एन्टरटेनमेंट एलएलपी कंपनीमधील भागिदारांनीच दीड कोटी रक्कमेची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉयने अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
आरसीएफ पोलिसांकडून हरवलेले भ्रमणध्वनी संबंधितांना परत
याप्रकरणी निर्माता संजय सहा यांच्यासह नंदिता सहा, राधिका नंदा व इतर आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ओबेरॉय मेगा इंटरटेमेंटचे सनदी लेखापाल देवेन बाफना (५७) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला आहे.
डेंग्यूच्या चाचणीचे शुल्क निश्चित करण्यासाठी समिती स्थापन
२४ फेब्रुवारी २०१७ रोजी ओबेरॉय ऑर्गनिक एलएलपीची स्थापना करण्यात आली होती. विवेक आणि त्यांची पत्नी प्रियंका या कंपनीचे भागीदार आहेत.
