शासकीय वैद्यकीय,दंत महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई दि.२१ :- वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील १८ शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉयची दीड कोटी रुपयांची फसवणूक
१४ वैद्यकीय महाविद्यालयांना जेनेरिक औषधांची केंद्रे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी चार संस्थांना जेनेरिक औषध केंद्रे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यांच्याबरोबर करण्यात आलेल्या कराराचा कालावधी संपुष्टात आला आहे. या चार संस्था आणि अन्य १४ संस्थांना आता जेनेरिक औषधाची केंद्रे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
डेंग्यूच्या चाचणीचे शुल्क निश्चित करण्यासाठी समिती स्थापन
ही जेनेरिक औषधाची केंद्र सुरू करण्यासाठी नॅकोफ इंडिया लिमिटेड (नॅशनल फेडरेशन ऑफ हार्मर्स प्रोक्युरमेट प्रोसेसिंग ॲण्ड रिटेलिंग को-ऑपरेटीव्ह ऑफ इंडिया) या केंद्र सरकार पुरस्कृत बहुराज्यीय सहकारी संस्थेसोबत करार करण्यात आला आहे.
