राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलासह खातेवाटप जाहीर – विरोधानंतरही अजित पवार यांना अर्थमंत्रीपद
मुंबई, दि. १४
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले. शिवसेना आमदारांचा विरोध असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यात आले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
शिवसेनेशी भावनिक युती तर राष्ट्रवादी काँग्रेससशी राजकीय मैत्री- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन हे खाते देण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तर दिलीप वळसे-पाटील यांच्यकडे सहकार खाते देण्यात आले आहे.
हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य, धनंजय मुंडे यांच्याकडे कृषि, अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास हे खाते देण्यात आले आहे.
निवडणुकीपूर्वी काही गुन्हेगारांना तुरुंगातून बाहेर काढण्याचे षडयंत्र- संजय राऊत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असतील तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असणार आहेत.
इतर मंत्री आणि त्यांचे खाते वाटप असे-
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर मुनगंटीवार– वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांतदादा पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार गावित– आदिवासी विकास
गिरीश महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील– पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी भुसे– सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय राठोड– मृद व जलसंधारण
सुरेशभाऊ खाडे– कामगार
संदीपान भुमरे– रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत– उद्योग
तानाजी सावंत– सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार– अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक केसरकर– शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई– राज्य उत्पादन शुल्क
संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा– कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
—–
