राजकीय

शिवसेनेशी भावनिक युती तर राष्ट्रवादी काँग्रेससशी राजकीय मैत्री- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे दि.१४ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी आमची भावनिक, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी राजकीय मैत्री आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केले. भिवंडी जवळील अणजूर येथे आयोजित करण्यात आलेल्या परिसरात भारतीय जनता पक्षाच्या मेळावा/ प्रशिक्षण शिबीरात फडणवीस बोलत होते.‌ भाजपचे आमदार, खासदार आणि प्रदेश पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुंबईतील कापड गिरणी संग्रहालयाचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण

शिवसेनेबरोबर आमची २५ वर्षांची मैत्री, युती आहे. एका विचाराने आम्ही एकत्र आलो आहोत. राष्ट्रवादीशी आमची राजकीय मैत्री आहे. कदाचित पुढील १० ते १५ वर्षांत तीही भावनिक मैत्री होईल’,असेही फडणवीस म्हणाले.

बंद पडलेल्या ‘इरॉस’ चित्रपटगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू; नूतनीकरणानंतर ‘आयमॅक्स’ या नावाने नवी ओळख

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून ४५, तर विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर बळावर १५२ जागा जिंकेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषणात केला होता. त्याचा उल्लेख करून फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १५२ किंवा त्याहून अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *