वाहतूक दळणवळण

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई, दि. १६
देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या (रविवारी) मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
माटुंगा ते ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलासह खातेवाटप जाहीर – विरोधानंतरही अजित पवार यांना अर्थमंत्रीपद

हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ वडाळा रोड ते वाशी बेलापूर / पनवेल लोकल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड ते गोरेगाव/वांद्रेदरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेतर्फे २५ रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेडिंग यंत्रे सुरू – माफक दरात पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध

कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक आठवरून पनवेलसाठी विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर राम मंदिर ते बोरिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असून बोरिवली ते गोरेगाव दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *