निवडणुकीपूर्वी काही गुन्हेगारांना तुरुंगातून बाहेर काढण्याचे षडयंत्र- संजय राऊत
मुंबई, दि. १२
निवडणुकीपूर्वी काही गुन्हेगारांना तुरुंगातून बाहेर काढण्याचे षडयंत्र असून मुख्यमंत्री कार्यालयातून या कैद्यांशी वाटाघाटी सुरू आहेत, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज येथे केला.
भिवंडी येथे उद्या भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक
मुंबईत भांडूप येथील आपल्या निवासस्थानी राऊत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
मी लवकरच याचे पुरावे देईन, असेही राऊत यांनी सांगितले.
मी माझे कर्तव्य पार पाडले- किरीट सोमय्या
दरम्यान या पत्रकार परिषदेत अचानक एक साप दिसून आल्याने गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी सापाला हुसकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. अखेर सर्पमित्रांना बोलाविण्यात आले. त्यांनी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. हा साप बिनविषारी होता.
—-
