पश्चिम रेल्वेतर्फे २५ रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेडिंग यंत्रे सुरू – माफक दरात पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध
मुंबई, दि. १३
प्रवाशांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे २५ रेल्वे स्थानकांवर ५३ वॉटर व्हेडिंग यंत्रे बसवण्यात आली आहेत.
वॉटर व्हेडिंग यंत्रे बसविणे आणि सेवा पुरविण्याचे पाच वर्षांचे कंत्राट पश्चिम रेल्वेकडून कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे. यातून ३२.५६ लाख रुपये इतका वार्षिक महसूल पश्चिम रेल्वेला मिळणार आहे.
वॉटर व्हेंडिंग यंत्रांमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. या यंत्रांमुळे प्रवाशांना माफक दरात पिण्याचे पाणी विकत घेता येईल. प्रवाशांना बाटलीत पाणी पुन्हा भरण्याचा किंवा बाटलीबंद पाणी विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही सुविधा २४ तास उपलब्ध आहे.
—–