राजकीय

भाजप पदाधिका-याच्या बैठकीला पंकजा, प्रीतम मुंडे भगिनी गैरहजर

मुंबई, दि. १३
भारतीय जनता पक्षातर्फे भिवंडी येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे भगिनी अनुपस्थित होत्या.

पाठीत खंजीर खुपसण्याचे संस्कार माझ्यावर नाही – पंकजा मुंडे

आगामी लोकसभा निवडणूक तयारीसाठी भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक आणि प्रशिक्षण वर्ग उद्या भिवंडी येथे आयोजित करण्यात आला होता. भाजपचे केंद्रीय पदाधिकारी, राज्यातील सर्व आमदार-खासदार, लोकसभा व विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूकप्रमुख, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, प्रदेश सुकाणू समिती सदस्य आदी पदाधिकारी या प्रशिक्षण वर्गास उपस्थित होते.

मुंडे भगिनींच्या गैरहजेरीचे कारण कळू शकलेले नाही. अलिकडेच पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत आपण दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाणार असल्याचे सांगितले होते.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *