Thursday, August 20, 2026
Latest:
वाहतूक दळणवळण

तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

मुंबई, दि. १३
बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली होती.‌ बोरिवली अप आणि डाऊन मार्गावर हा तांत्रिक बिघाड झाला होता.

या तांत्रिक बिघाडामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद आणि धीम्या दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. काही वेळानंतर बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत झाल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *