टिळकनगर काँलेज आँफ काँमर्सच्या दोन नव्या अभ्यासक्रमांचे उदघाटन
डोंबिवली, दि. १३
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळकनगर काँलेज आँफ काँमर्समध्ये दोन नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याचे उदघाटन १६ जुलै रोजी संध्याकाळी होणार आहे.
मुंबई विद्यापीठाने ‘बीएमएस’ आणि ‘बीएएफ’ या अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे.
संध्याकाळी सहा वाजता टिळकनगर विद्या मंदिर, डोंबिवली पूर्व येथील पेंढरकर सभागृहात अभ्यासक्रमांचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांत सेवा विभागाचे प्रमुख विवेक भागवत यांच्या हस्ते होणार आहे.
या दोन्ही अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा तसेच उदघाटन सोहळ्यास डोंबिवलीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन काँलेजचे प्राचार्य नारायण फडके, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह आशिर्वाद बोंद्रे यांनी केले आहे.
——