अकरावी प्रवेशाची तिसरी प्रवेश यादी जाहीर – १४ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करणे आवश्यक
मुंबई, दि. १२
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची तिसरी प्रवेश यादी आज सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी साठी ‘रिड इंडिया’ उपक्रम- दीपक केसरकर
तिसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या १ लाख ५४ हजार ३५३ जागांसाठी एकूण १ लाख ४४ हजार १८६ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी तब्बल ७५ हजार १४७ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले.
१६ हजार ९७९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, ९ हजार ४७८ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि ७ हजार ६८९ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.
बाणगंगा परिसराचा विकास आणि सुशोभिकरण होणार
तिसऱ्या प्रवेश यादीतील पात्र विद्यार्थ्यांना १४ जुलै (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) पर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे. नियमित फेरीच्या वेळापत्रकानुसारच कोट्यांतर्गत प्रवेश घेता येणार आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा आता २३ टक्के,
संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास सहमती असल्यास विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करून घ्यावा.
—-
