वाहतूक दळणवळण

मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलला प्रवाशांची पसंती

एप्रिल ते जून महिन्यात ४९.४८ लाख प्रवाशांचा प्रवास

मुंबई, दि. १२
मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलला प्रवाशांची पसंती मिळाली असून यंदा एप्रिल ते जून या कालावधीत ४९.४८ लाख प्रवाशांनी वातानुकूलित लोकलमधून प्रवास केला, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.‌

महापालिकेतर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आणखी तीन सीबीएसई शाळा सुरू

गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २२.८८ लाखांनी वाढ झाली. रेल्वेच्या महसुलात यामुळे ११ कोटी रुपयांची भर पडली आहे. वातानुकूलित लोकलमधून एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत दररोज सरासरी २९,२२१ प्रवासी प्रवास करीत होते.

अकरावी प्रवेशाची तिसरी प्रवेश यादी जाहीर – १४ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करणे आवश्यक

या प्रवाशांकडून दररोज सरासरी १३.३५ लाखांचे उत्पन्न मिळत होते. एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत दररोज सरासरी ५४,३४४ प्रवाशांचा प्रवास केला. यातून दररोज सुमारे २५.६५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले .४ वातानुकूलित लोकलच्या दिवसभरात ५६ फेऱ्या चालविण्यात येत आहेत.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *