राजकीय

मी माझे कर्तव्य पार पाडले- किरीट सोमय्या

मुंबई, दि. ११
मी माझे कर्तव्य पार पाडले आहे. शेवटी पक्षाचा निर्णय असतो. पक्ष विशिष्ट पद्धतीने काम करतो. अनेक ठिकाणी न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे. न्यायालयात खटला सुरू असताना त्यावर बोलणे बरोबर नाही, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

मुंबईतील माहिम रेल्वे स्टेशन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १७ व्या वर्षपूर्तीनिमित्त श्रद्धांजलीपर कार्यक्रमानंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांची प्रकरणे बाहेर काढली तेच आता भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. याबाबत सोमय्या यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उपरोक्त उत्तर दिले.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *