हसन मुश्रीफ यांना न्यायालयाचा दिलासा; येत्या २५ जुलैपर्यंत अटक टळली
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने दिलासा दिला आहे. येत्या २५ जुलैपर्यंत हसन मुश्रीफ यांना अटक न करण्याचे संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.
मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीने दोन कारखान्यांतील व्यवहाराबाबत कारवाई सुरू केली आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या काही मालमत्तांवरही छापे टाकले आहेत. या पार्श्वभूमीवर अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
मुंबई सत्र न्यायालयात मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. जावेद, आबिद आणि नावेद या तिन्ही मुलांना न्यायालयाने १९ जुलैपर्यंत दिलासा दिला आहे.
—
