वाहतूक दळणवळण

विद्याविहार रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम येत्या ३० सप्टेंबर २०२३पर्यंत पूर्ण होणार

मुंबई, दि. १०
विद्याविहार पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम येत्या ३० सप्टेंबर २०२३पर्यंत पूर्ण होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचे बांधकाम रखडले होते.‌
महापालिका पूल विभागाने पुलाच्या कामाचे कार्यादेश १९ एप्रिल, २०१८ रोजी देण्यात आले होते. त्यावेळी काम पूर्ण होण्याचा कालावधी ४ नोव्हेंबर, २०२० होता.

वरळी येथील मैदान महापालिका विकसित वकरणार

उड्डाणपूल प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे १७८ कोटी रुपये आहे. यापैकी, रेल्वे रुळावरील मुख्य उड्डाणपुलाचा खर्च सुमारे १०० कोटी रुपये तर पोहोच मार्ग आणि इतर कामे मिळून ७८ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर पूर्व उपनगरांतील घाटकोपर, चेंबूर परिसरांत होणाऱ्या वाहतूककोंडीतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील २८ हजारांहून अधिक नादुरुस्त रोहित्रे बदलली

माहितीचा अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका प्रशासनाकडे या उड्डाणपुलाविषयी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *