समृध्दी महामार्गासह अन्य महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी लोकसहभाग आवश्यक- डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. ६
समृध्दी महामार्ग आणि इतर महामार्गावरील अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणेतील त्रुटी दूर करणे तसेच जनजागृतीसाठी लोकसहभाग अत्यावश्यक आहे, असे विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
#BMC: महापालिका निवृत्तीवेतन धारकांसाठी ‘फॉर्म – १६’ ३१ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन उपलब्ध
महामार्गावर गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. त्याची दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आज विधान भवनातील समिती कक्षात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
साथीच्या आजाराचे रुग्ण शोधण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाची धडक मोहीम
परिवहन,बांधकाम व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि संबंधित विभागाने पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कृतीच्या अंमलबजावणीसाठी आपापसात समन्वय साधावा. तसेच प्रवास वाहतूक निर्धोक होण्यासाठी सर्व चालकांसाठी आचारसंहिता, स्त्री,पुरूष व अपंगांसाठी स्वच्छतागृह, सुसज्ज रुग्णवाहिका , हेल्पलाइन नंबर्स ची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही डॉ. गो-हे यांनी केल्या.
बोगस डॉक्टर उपलब्ध करून देणा-या संस्थेचे कंत्राट रद्द, संस्थेचे नाव काळ्या यादीत
सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा विमा आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या वाहन चालकांसाठी आचार संहिता तयार करावी. वाहन चालक, वाहन मालक तसेच सामाजिक संघटना व संबंधीत अधिकारी यांची दक्षता समिती तयार करण्यात यावी. तसेच राष्ट्रीय महामार्गावर स्वच्छतागृह किमान अंतरावर असावीत,
समृद्धी महामार्गवर 8181818155 हा हेल्पलाईन क्रमांक ठळकपणे सर्वत्र लावावा, असेही त्यांनी सांगितले.
——-
लक्ष्मणराव इनामदार यांचे जीवन अलौकिक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
