ठळक बातम्या

ऑनलाईन दंड वसूल करणार; मध्य रेल्वेचा उपक्रम

मुंबई, दि. ६
विनातिकीट प्रवाशांकडून दंडाची रक्कम स्वीकारण्यासाठी मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीसांना ‘पेमेंट स्कॅनर ॲप’ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मुंबई विभागात १० तिकीट तपासनीसांना ऑनलाईन दंड स्वीकारण्यासाठी हे ॲप देण्यात आले असून त्यामुळे विनातिकीट प्रवाशांकडून तिकिट तपासनीसांना ऑनलाइन दंड वसूल करता येणार आहे.

लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये काही तिकीट तपासनीसांना ‘पेमेंट स्कॅनर ॲप’ देण्यात आले आहे. तसेच उपनगरीय रेल्वेवर कार्यरत १० तिकीट तपासनीसांनाही हे ॲप देण्यात आले आहे.

विनातिकीट प्रवासी दंडाची रक्कम भरण्यासाठी रोख रक्कम नसल्याचे कारण पुढे करतात आणि ऑनलाइन पद्धतीने दंड भरण्याची तयारी दर्शवितात. ऑनलाईन दंडवसुलीमुळे तिकीट तपासनीस आणि प्रवाशांमध्ये होणारा वाद थांबण्यास मदत होणार आहे.‌

विनातिकीट प्रवाशांना दंडाची रक्कम ऑनलाइन भरता यावी यासाठी मध्य रेल्वेने मोबाइल ॲपची निर्मिती करण्यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये प्रयत्न सुरू केले होते त्याला आता मूर्त स्वरूप आले आहे.

विनातिकीट प्रवाशांकडून तिकिट तपासनीस
ऑनलाईन दंड वसूल करणार; मध्य रेल्वेचा उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *