Thursday, August 20, 2026
Latest:
ठळक बातम्या

बोगस डॉक्टर उपलब्ध करून देणा-या संस्थेचे कंत्राट रद्द, संस्थेचे नाव काळ्या यादीत

बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाची कारवाई
मुंबई, दि. ४
बृहन्मुंबई महापालिकेच्या मुलुंड येथील एम. टी. अगरवाल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये बोगस डॉक्टर उपलब्ध करून देणा-या जीवन ज्योति चॅरिटेबल ट्रस्टला दिलेले कंत्राट रद्द करण्यात आले आहे. तसेच या संस्थेचे नाव काळ्यायादीत टाकण्यात आले आहे.

अगरवाल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर संस्थेने उपलब्ध केलेले डॉक्टर बोगस असल्याचे उघडकीस आले.

याआधीही याच संस्थेने सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये अशाप्रकारे हलगर्जीपणा केल्याचे उघडकीस आले होते. मात्र तेव्हा कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.

अगरवाल प्रकरणानंतर महापालिका प्रशासनाने ट्रस्टविरोधात कारवाई सुरू केली. ट्रस्टला देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्यात आले असून ट्रस्टचे नाव काळ्यायादीत टाकण्यात आले असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *