ठळक बातम्या

#BMC: महापालिका निवृत्तीवेतन धारकांसाठी ‘फॉर्म – १६’ ३१ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन उपलब्ध

महापालिका निवृत्तीवेतन धारकांसाठी ‘फॉर्म – १६’
३१ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन उपलब्ध
मुंबई, दि. ५
बृहन्मुंबई महापालिकेचे सुमारे १ लाख ९ हजार ६४१ निवृत्तीवेतन धारक असून यापैकी ७४ हजार ९५२ निवृत्तिवेतनधारकांचे ‘प्रपत्र-१६’ महापालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ऑनलाईन पद्धतीने आर्थिक वर्ष २०२२-२३ चे आयकर विषयक ‘प्रपत्र – १६’ उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रमुख लेखापाल (कोषागार) सुलोचना कवडे यांनी दिली.
सदर ऑनलाईन प्रपत्रे कोणत्याही इंटरनेट ब्राऊझरचा उपयोग करुन प्राप्त करता येऊ शकती. इंटरनेट ब्राऊझर ओपन केल्यानंतर ‘https://form16.mcgm.gov.in’ या संकेतस्थळावर लॉगीन करावे, दिलेल्या चौकोनामध्ये कर्मचारी संकेतांक नमूद करून त्याखालील चौकोनामध्ये ‘पॅन’ क्रमांकाची अचूक नोंद करावी.
आर्थिक वर्ष २०२२-२३ चे प्रपत्र – १६ महापालिकेच्या संकेतस्थळावर ३१ मार्च २०२४ पर्यंत उपलब्ध राहील, याची निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *