सामाजिक

भाऊ नानिवडेकर यांचे निधन

ठाणे, दि. १३
विद्यादान सहाय्यक मंडळाचे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीराम उर्फ भाऊ नानिवडेकर यांचे सोमवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित पुत्र, एक विवाहित कन्या, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुलांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी २००८ मध्ये विद्यादान सहाय्यक मंडळाची स्थापना केली. या मंडळाद्वारे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आले.

ठाणे महापालिकेने ‘ठाणे गौरव’ हा पुरस्कार देवून भाऊंना सन्मानित केले होते.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *