‘स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा शुभारंभ’, मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ७
नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि बांधकाम साहित्यच्या (डेब्रिज) तक्रारीसाठी विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन (8169681697) चा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईतील पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण करणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगिण विकास करण्यावर भर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास राज्याचे बंदरे विकास व खनीकर्म मंत्री दादा भुसे, खासदार राहुल शेवाळे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
रस्त्यावर पडलेल्या कच-याची तक्रार आता व्हॉट्स अपवर – बृहन्मुंबई महापालिकेची सुविधा सोमवारपासून सुरु
मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
रायगड किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक देण्याची सूचना महापालिका आयुक्तांना केली होती. उपरोक्त क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजविषयी तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासात त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पर्यटन आणि कृषी क्षेत्रासाठी जपानच्या सहकार्याचे स्वागत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे सांगत पुनर्विकासाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, मुंबई महापालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
——
