ठळक बातम्या

डोंबिवली पश्चिमेतील १७४ इमारतींना संरचनात्मक परीक्षण करून घेण्याची सूचना

डोंबिवली, दि. ७
डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग क्षेत्रात ३० वर्षापूर्वीच्या १७४ इमारती असून इमारतीच्या पदाधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसांच्या कालावधीत इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करुन घ्यावे. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगिण विकास करण्यावर भर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अनेक इमारतींच्या रहिवाशांनी संरचनात्मक परीक्षण करून घेतले नाही. काही इमारतींमध्ये जमीन मालक, रहिवासी यांच्यात न्यायालयीन वाद आहेत. अशा काही इमारतींचे परीक्षण होत नाही. अनेक वर्ष इमारतीची देखभाल न करता रहिवासी अशा इमारतींमध्ये राहत असून काही इमारती धोकादायक झाल्या आहेत.

Dombivli Riksha : बेशिस्त रिक्षा चालक, दुचाकी, मोटार चालकांवरील कारवाईत डोंबिवलीत एक लाख ४५ हजारांचा दंड वसूल

साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह ह प्रभाग हद्दीतील ३० वर्षापूर्वीच्या इमारती शोधण्याची मोहीम गेल्या महिन्यात राबविली होती.

Dombivli Rikshaw : डोंबिवली पश्चिम ते सावित्रीबाई फुले नाट्यगृह… सांगितले १०० रुपय, ८० रुपयांवर तयार झाला आणि मीटरने झाले फक्त ४८ रुपये…

इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करुन तो अहवाल महापालिकेत सादर करावा. अहवालानुसार रहिवाशांनी तातडीने देखभाल दुरुस्ती करून घ्यावी, अशी सूचनाही गुप्ते यांनी केली आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *