किटकनाशक विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त पदे तातडीने न भरल्यास १६ जूनपासून आंदोलन – दि म्युनिसिपल युनियनचा इशारा
मुंबई, दि. ६
बृहन्मुंबई महानगरपालिका किटकनाशक विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेली १२१ पदे पदोन्नतीने येत्या १५ जूनपर्यंत तत्काळ भरण्यात यावीत, अन्यथा १६ जूनपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दि म्युनिसिपल युनियनने दिला आहे.
अप्पर कामगार आयुक्त कार्यालयासमोर राज्य वीज कंत्राटी कामगार संघांचे उद्यापासून बेमुदत उपोषण
दि म्युनिसिपल युनियन याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आह. मात्र महापालिकेकडून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, कीटक संकलक, प्रतिवेदन वाहक या संवर्गाची सर्व पदे पावसाळ्यापूर्वी भरण्यात येतील, असे किटकनाशक अधिकारी यांनी आश्वासन दिले होते. परंतु पावसाळा तोंडावर आला तरीही या पदावर कामगारांना पदोन्नती देण्यात आलेली नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.
कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून या असंतोषाचा कोणत्याही क्षणी उद्रेक होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ऐन पावसाळ्यात उद्भविणाऱ्या परिस्थितीस आणि त्यामुळे मुंबईच्या नागरीकांना होणाऱ्या त्रासास महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
—
