मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची नियुक्ती
मुंबई, दि. ६
डॉ रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तर डॉ. संजय घनश्याम भावे यांची डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या सुशोभिकरणास लवकरच सुरुवात, विविध कामांसाठी निविदा जाहीर
राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी ही घोषणा केली. डॉ रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक, डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक तर डॉ संजय भावे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.
