ठळक बातम्या

भारतीय प्रशासन सेवेतील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या – बहुचर्चित तुकाराम मुंढे आता मराठी भाषा विभागाचे सचिव

मुंबई, दि. २
राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज (२ जून) याबाबत शासन आदेश काढण्यात आला. बहुचर्चित अधिकारी तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉ. सुधाकर शिंदे यांची बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नियुक्ती करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एस. व्ही. आर श्रीनिवास यांची एमएमआरडीएमधून धारावी पुनर्विकास प्रकल्पात नियुक्ती करण्यात आली असून बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांची महाडिस्कॉमच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजीव जयस्वाल यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातून म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, आशीष शर्मांची बृहन्मुंबई महापालिकेतून नगर विकास विभागात नियुक्ती करण्यात आली.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *