ठळक बातम्या

राजभवनात उद्या ‘तेलंगणा राज्य स्थापना दिन’ साजरा होणार

मुंबई, दि. १
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून यंदा प्रथमच महाराष्ट्र राजभवन येथे ‘तेलंगणा राज्य स्थापना दिन’ साजरा केल्या जाणार आहे.
राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (२ जून) संध्याकाळी साडेपाच वाजता तेलंगणा राज्य स्थापना दिनानिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ‘निर्भय बनो’ चे महेश निंबाळकर यांंचे आंदोलन

राजभवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात ‘जय जय हे तेलंगणा’ नृत्य, ‘बथकम्मा’ व ‘बोनालू’ नृत्याचे सादरीकरण केले जाणार आहे.

रायगड किल्ल्यावर उद्या शिवराज्याभिषेकदिन सोहळा

२ जून हा तेलंगणा राज्य स्थापना दिवस देशातील सर्व राजभवनांमध्ये साजरा केल्या जाणार आहे. २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती.

ठाणे शहरात ४७ शाळा अनधिकृत, इंग्रजी माध्यमांच्या ४२ शाळांचा समावेश

‘महाराष्ट्र राजभवन तसेच तेलंगणा शासन व फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *