दादासाहेब फाळके चित्रनगरीतील पायाभूत सोयी-सुविधा आणि विकास कामांसाठी शासनाकडून शंभर कोटींचा निधी
मुंबई, दि. ३१
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसराच्या पायाभूत सोयी-सुविधा आणि विकास कामांसाठी राज्य शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, अशीमाहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमावली जाहीर
शासनाकडून मिळाल्या निधीतून चित्रनगरीतील कलाकारांच्या ( स्टुडीओ) बाहेरील दुरुस्तींची कामे करण्यात येणार असून चित्रनगरीतील हद्दीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संरक्षक भिंती बांधल्या जाणार आहेत. यापूर्वीच्या संरक्षक भिंतींचीही डागडुजी करण्यात येणार आहे.
चित्रीकरण तसेच पर्यटनाच्या दृष्टीने छोट-छोटी चित्रीकरण स्थळे नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत. तर सध्या अस्तित्वात असणा-या बाह्यचित्रीकरण स्थळांचे सुशोभिकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आगामी काळात चित्रीकरण करण्यासाठी निर्मितीसंस्थाना आवश्यक त्या सर्व सुविधा चित्रनगरी परिसरातच उपलब्ध होतील यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही सुरु असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.
——-
