ठळक बातम्या

बुरख्याच्या सक्तीला ‘मूर्खपणा’ म्हणण्याची हिंमत भुजबळ, पुरोगामी आणि ब्रिगेडी मंडळी दाखवतील का?

हिंदू जनजागृती समितीचा सवाल

मुंबई दि.३० :- मक्केतील ‘काबा’चे दर्शन घेण्यासाठी जाणारे सर्व मुसलमान पुरुष ‘पुजार्‍यांप्रमाणेच’ कमरेच्यावर वस्त्र घालत नाहीत, त्यांना ‘अर्धनग्न’ म्हणण्याची हिंमत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांमध्ये आहे का ? मुसलमान महिलांची इच्छा असो वा नसो, त्यांच्यावर बुरख्याची सक्ती केली जाते, याला ‘मूर्खपणा’ म्हणण्याची हिंमत भुजबळ, पुरोगामी आणि ब्रिगेडी मंडळी दाखवतील का ? असा परखड प्रश्न हिंदू जनजागृती समितीने केला आहे.

बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहात म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांचा बाजार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील विविध मंदिरांनी लागू केलेल्या वस्त्रसंहितेवर टीका करतांना ‘मंदिरातील पुजारी उघडेबंब असतात. त्यांना पूर्ण कपडे घालण्यासाठी सांगा’, अशी हिंदु धर्माप्रती द्वेष दर्शवणारी टीका केली. त्याचाही समितीने तीव्र निषेध केला आहे. हेच लोक ‘हिजाब’चे समर्थन करतात आणि मंदिरांतील वस्रसंहितेवर टीका करतात, हा तथाकथित पुरोगाम्यांचा दुतोंडीपणा आहे.

राज्य शासनाच्या ‘मौखिक आरोग्य अभियान’चे ‘सदिच्छा दूत’ म्हणून सचिन तेंडुलकर

पोलिसांचा खाकी गणवेश, डॉक्टरांचा पांढरा कोट, वकीलांचा काळा कोट हे धर्मनिरपेक्ष शासनाने योजलेले ‘ड्रेसकोड’ चालतात. स्वत: भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असतांना राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत ‘वस्त्रसंहिता’ लागू केली होती. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचारी यांना जीन्स पँट, टी-शर्ट, भडक रंगाचे वा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच स्लीपर वापरता येणार नाही. केवळ शोभनीय वस्त्र घालण्याचा नियम केला होता; मात्र मंदिरात केवळ संस्कृतीप्रधान वस्त्र घालण्याचे आवाहनही यांना चालत नाही. हा भारतीय संस्कृतीद्वेषच आहे. अशी भारतीय संस्कृती विरोधी भूमिका घेणार्‍यांना येत्या काळात जनता धडा शिकवेल, असे समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *