‘श्रीधान्य आणि आपले आरोग्य’ विषयावर डॉ. पुष्कर वाघ यांचे व्याख्यान
डोंबिवली दि.३० :- भारत विकास परिषद डोंबिवली शाखा आणि श्री. लक्ष्मी नारायण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानसंध्या कृतीसंध्या’ उपक्रमात श्रीधान्या आणि आपले आरोग्य’ या विषयावर डॉ. पुष्कर वाघ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
बुरख्याच्या सक्तीला ‘मूर्खपणा’ म्हणण्याची हिंमत भुजबळ, पुरोगामी आणि ब्रिगेडी मंडळी दाखवतील का?
आयुर्वेदामध्ये आहाराचे महत्त्व हे विषद करताना डॉ वाघ यांनी प्रोटीन्स च्या अतिरेकी सेवनाने काय आणि कसे दुष्परिणाम होतात यावर प्रकाश टाकला. तृणधान्य पिकविण्यात आर्थिक बाजू जमेची कशी आहे हे समजावून सांगितले. तृणधान्य सेवन केल्याने अनावश्यक मेद नाहीसा होऊन मधुमेहावरही नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते.
बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहात म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांचा बाजार
तसेच रक्तदाब कमी करण्यात सहाय्य होते, असेही डॉ. वाघ म्हणाले. भारत विकास परिषदेच्या अध्यक्ष वृंदा कुलकर्णींनी यांनी परिषदेचा तर माधव जोशी यांनी श्री लक्ष्मीनारायण संस्थेचा परिचय करून दिला. डॉ. मंजिरी घरत यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन मेधा वैद्य यांनी केले. सीमा विचारे यांनी आभार मानले.
