वाहतूक दळणवळण

एसटीच्या चालक वाहकांना पुरेशा विश्रांतीसाठी वातानुकूलित विश्रांती गृह बांधण्यात येणार

मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन

मुंबई दि.३० :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक वाहकांना पुरेशी आणि चांगली विश्रांती मिळावी यासाठी वातानुकूलित विश्रांती गृह बांधून देण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिले.

‘श्रीधान्य आणि आपले आरोग्य’ विषयावर डॉ. पुष्कर वाघ यांचे व्याख्यान

जिल्हा नियोजन मंडळाच्या ३ टक्के निधीतून मुंबई सेंट्रल बसस्थानकावर बांधण्यात आलेल्या पहिल्या हिरकणी कक्षाचे उदघाटन झाले. त्यावेळी केसरकर बोलत होते. भविष्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी विश्रांती गृहे जिल्हा नियोजन व विकास योजनेतून व्हावीत यासाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरेल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहात म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांचा बाजार

मुंबई सेंट्रल येथील सध्याच्या चालक-वाहक विश्रांतीगृहाला भेट दिली व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव नीवतकर व एसटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *