ठळक बातम्या

राज्य शासनाचे नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण येत्या १५ दिवसांत सादर- उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २१
राज्य शासनाचे नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण येत्या १५ दिवसांत सादर करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य प्रकाश आबिटकर, संजय सावकारे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये राज्यातील छोट्या शहरात आयटी केंद्र उभारण्याबाबतची अर्धा तास चर्चेची सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना सामंत बोलत होते.

नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणामध्ये रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, याचा विचार करण्यात आला आहे. महाराष्ट्राने नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण आणले असले तरी महाराष्ट्राचे आतापर्यंत माहिती तंत्रज्ञान केंद्र (आयटीहब) धोरण नाही.

कोल्हापूर येथे येणाऱ्या काळात नवीन माहिती तंत्रज्ञान केंद्र उभारण्यासंदर्भात विचार करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *