भायखळा येथील राणीची बाग उद्या सुरू राहणार
मुंबई दि.२१ :- भायखळा पूर्व येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थातच राणीची बाग उद्या (बुधवारी) साप्ताहिक सुट्टी असली तरी सुरू राहणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला दर बुधवारी साप्ताहिक सुट्टी असते. मात्र महापालिकेने याआधी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या बुधवारी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी सवलतीचा सकारात्मक विचार करून मिळालेल्या संधीचे सोने करा- प्रदीप पेशकार
त्यानुसार उद्या २२ मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी असली तरी उद्यान व प्राणिसंग्रहालय खुले राहणार आहे. या आठवड्यातील साप्ताहिक सुट्टी येत्या गुरुवारी ( २३ मार्च) रोजी असणार आहे.
