Thursday, June 25, 2026
Latest:
ठळक बातम्या

वडाळा पूर्व येथील ‘बेस्ट’च्या विद्युत उपकेंद्राला आग

मुंबई, दि. २१
वडाळा पूर्व येथील संगमनगर परिसरातील ‘बेस्ट’च्या विद्युत उपकेंद्राला सोमवारी रात्री आग लागली. या आगीमध्ये आजूबाजूच्या झोपड्या जळाल्या.

वडाळा येथील विद्यालंकार महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या झोपडपट्टीजवळ बेस्टचे विद्युत उपकेंद्र आहे.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली, असे सांगण्यात आले. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरा आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *