सरकारी सवलतीचा सकारात्मक विचार करून मिळालेल्या संधीचे सोने करा- प्रदीप पेशकार
डोंबिवली, दि. २१
कोणत्याही सरकारी सवलतीचा नकारात्मक विचार न करता त्यातून सकारात्मक विचार घेऊन आपण सरकारने दिलेल्या संधीचे सोने करून घेऊ शकतो, असे प्रतिपादन सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालयाचे (भारत सरकार) सदस्य प्रदीप पेशकार यांनी येथे केले.
ब्राह्मण महासंघ-डोंबिवली आणि ब्राह्मण सभा- डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण सभा सभागृहात आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘विविध व्यवसाय संधी आणि सरकारी योजना’ या विषयावर मार्गदर्शन करताना पेशकार बोलत होते.
भविष्यातील विविध उद्योगाचा तपशीलवार विचार करून त्यात आपण उद्योग संधी कशी मिळवू शकतो याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मानस पिंगळे, कार्यवाह अनघा बोन्द्रे , महासंघाचे सदस्य विवेक वामोरकर, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ.विनय भोळे आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भोळे यांच्या हस्ते पेशकार यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ तर पिंगळे यांच्या हस्ते पेशकार यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पिंगळे यांनी ब्राह्मण प्रास्ताविक केले. डॉ. भोळे यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.
——
