एअर इंडिया’ची इमारत खरेदी करण्यासाठी राज्य शासनाचा केंद्र सरकारकडे नवा प्रस्ताव
मुंबई, दि. २१
नरिमन पॉइंट परिसरातील ‘एअर इंडिया’ची २३ मजली इमारत
१ हजार ६०० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा नवा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाकडे सादर केला आहे. ‘एअर इंडिया’ची इमारत राज्य शासनाला मिळावी म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.
महाराष्ट्र सरकारबरोबरच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अन्य एका सरकारी उपक्रमानेही एअर इंडियाची इमारत खरेदी करण्यासाठी स्वारस्य दाखविले होते. पण एअर इंडियाचे खासगीकरण होणार असल्याने केंद्र सरकारने निर्णय घेण्याचे टाळले होते.
एअर इंडियाची मालकी आता टाटा कंपनीकडे आली असली तरी इमारतीची मालकी ‘ए.आय. ॲसेट होिल्डग कंपनी’कडे आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर एअर इंडिया इमारत महाराष्ट्र सरकारला देण्याता निर्णय घेण्यात येणार आहे.
——-
