‘महाराष्ट्र शाहीर’ येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होणार
मुंबई दि.२० :- मराठी लोकसंगीत, लोककला संपूर्ण महाराष्ट्रात, देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविणा-यांमधील एक अग्रणी नाव म्हणजे कृष्णराव गणपत अर्थातच शाहीर साबळे.
संपातील शिक्षकांच्या सहभागामुळे दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपसणीविना
शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिल या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत असून केदार शिंदे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
संपातील शिक्षकांच्या सहभागामुळे दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपसणीविना
राजा बढे यांनी लिहिलेल्या, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि शाहीर साबळे यांनी गायलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याला नुकताच राज्य गीताचा दर्जा मिळाला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या निमित्ताने शाहीर साबळे यांचे कार्यकर्तृत्व आणि जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर येणार आहे.