ठळक बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांची घोषणाबाजी आणि सभात्याग

मुंबई दि.०९ :- अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकरी हवालदिल झाले असून कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केला.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख रुपयांपर्यंत

शेतकऱ्यांना तत्काळ मदत सरकार जाहीर करत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकार आवश्यक मदत देईल, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

राज्यात आता शक्तीपीठ महामार्ग, बारा जिल्ह्यातील देवस्थाने जोडली जाणार

सरकारने तातडीने पंचनामे सुरू केले, काही कामे अद्याप बाकी आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याला मदत देऊ, विरोधकांनी राजकारण यावर करू नये, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *