राज्य अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया
अर्थसंकल्पा प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)
गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पातील “पंचामृत” महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतिमान करणारे आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांची घोषणाबाजी आणि सभात्याग
अजित पवार ( विधानसभा विरोधी पक्षनेते)
राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा सुकाळ आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता यातील किती गोष्टींची फलश्रृती होईल याबाबत शंकाच आहे. दूरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाचे भान नसणारा अर्थसंकल्प आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख रुपयांपर्यंत
नाना पटोले ( महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष)
अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ असून प्रत्यक्षात काहीही नाही तर केवळ मोठं मोठ्या आकड्यांची घोषणा आहे. हा अर्थसंकल्प अर्थहिन व जनतेची दिशाभूल करणारा असून अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस आहे,
राज्यात आता शक्तीपीठ महामार्ग, बारा जिल्ह्यातील देवस्थाने जोडली जाणार
बाळासाहेब थोरात ( काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते)
शब्दांचे आणि आकड्यांचे फुलोरे अर्थसंकल्पात फुलविण्यात आले आहेत. ज्या गोष्टी सत्यात उतरूच शकत नाही अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न अर्थसंकल्पात केलेला दिसतोय.
संघटित- असंघिटत महिला कामगारांच्या न्याय हक्कांसाठी भारतीय मजदूर संघ संघर्ष करणार
उद्धव ठाकरे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख)
या अर्थसंकल्पात अनेक मोठ-मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून हा अर्थसंकल्प गाजर हलवा अर्थसंकल्प आहे.