महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख रुपयांपर्यंत
मुंबई दि.०९ :- शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय उपचार घेण्यासाठी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आता ही मर्यादा आता पाच लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली.
राज्यात आता शक्तीपीठ महामार्ग, बारा जिल्ह्यातील देवस्थाने जोडली जाणार
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना आत्तापर्यंत दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत होते. आता ही मर्यादा आता पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वैद्यकीय उपचारांसाठी सर्वस्वीपणे सरकारी रुग्णालयांवर अवलंबून असणाऱ्या गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे एका आर्थिक वर्षात नागरिकांना रुग्णालयात पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतील.
संघटित- असंघिटत महिला कामगारांच्या न्याय हक्कांसाठी भारतीय मजदूर संघ संघर्ष करणार
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत २०० नवीन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना उपचार घेण्यासाठीच्या रुग्णालयांच्या पर्यायांमध्ये वाढ झाली आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ २.५० लाखांहून चार लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय, राज्यभरात ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु होणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.