राज्यात आता शक्तीपीठ महामार्ग, बारा जिल्ह्यातील देवस्थाने जोडली जाणार
मुंबई दि.०९ :- येत्या काही वर्षांत राज्यात शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येणार असून या महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील बारा देवस्थाने जोडली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. फडणवीस यांनी विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही माहिती दिली.
संघटित- असंघिटत महिला कामगारांच्या न्याय हक्कांसाठी भारतीय मजदूर संघ संघर्ष करणार
नागपूर- गोवा असा असा हा शक्ती महामार्ग असून त्यासाठी ८६ हजार ३०० कोटी रुपयांचा चा निधी मंजूर झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवीपर्यंत नागपूर गोवा- महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. सुमारे ७६० किलोमीटर असलेल्या या महामार्गामुळे मराठवाड्यातील अर्थकारणाला आणि जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना आता फक्त एक रुपयांत पीकविमा काढता येणार- उपमुख्यमंत्री फडणवीस
शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्रातील माहूर, तुळजापूर, अंबेजोगाई ही तीन शक्तीपीठे जोडली जाणार आहेत. त्याचबरोबर औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर देखील जोडली जाणार आहेत. हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना शक्ती महामार्गाचा लाभ होणार आहे.